क्रांतिवीर प्रतिष्ठान ही संस्था छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यपरंपरेचा वारसा जपत पारंपरिक भारतीय युद्धकला, आधुनिक मार्शल आर्ट, धनुर्विद्या, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, आत्मसंरक्षण, नेतृत्वगुण आणि राष्ट्रप्रेम यांचा प्रसार करण्यासाठी कार्यरत आहे.
ध्येय: छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून पारंपरिक भारतीय युद्धकला, धनुर्विद्या, कराटे आणि आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण देऊन शिस्तबद्ध, सुदृढ, आत्मविश्वासू, देशप्रेमी आणि जबाबदार नागरिक घडविणे.